आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराच्या मदतीने पतीला केले ब्लॅकमेल:पत्नीनेच साडे चार लाख रुपयांची खंडणी उकळली, पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​​​​​​​पत्नीने पतीकडूनच प्रियकराच्या मदतीने 4 लाख 50 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पतीच्या तक्रारीनंतर पत्नी व प्रियकराविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, एका अनोळखी नंबरहून त्यांना फोन आला. तुझ्या पत्नीचे लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबध आहेत. त्या दोघांचे खासगी फोटो आणि खासगी क्षणाचे व्हिडीओ रेकॉर्डींग सुध्दा माझ्याकडे आहे, असे सांगून संशयिताने पत्नीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले. हे प्रकरण मिटवायचे असल्यास पैशांची मागणी केली. फिर्यादीने समाजात बदनामी नको या भीतीपोटी ४ लाख ५० हजार रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ निरिक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

पत्नीवर आरोप
पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून दोघांचे अश्लिल फोटो मोबाईलवर पाठवले. पतीने बदनामी होईल या भीतीने ४ लाख ५० हजार रुपये दिले. पत्नी मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तक्रारीत पतीने केला आहे.

न्यायालयाचे आदेश

तक्रारदाराने न्यायालयात पत्नी व तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दिली होती. न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पत्नी व प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तक्रारदार पुरुषाने दोन महिन्यांपूर्वीही पत्नी आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांचे काम वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...