आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्यांची निवड:आयटकच्या राज्याध्यक्षपदी सी. एन. देशमुख, सचिवपदी राजू देसले

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शाहू स्मारक भवनात पार पडलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) च्या राज्य अधिवेशनात राज्यातील ९२ प्रतिनिधींची नवीन राज्य कौन्सिल सदस्यांची निवड करण्यात आली. राज्य अध्यक्षपदी कॉ. सी. एन. देशमुख, सरचिटणीसपदी श्याम काळे व सचिवपदी नाशिकच्या काॅ. राजू देसले यांची फेरनिवड करण्यात आली. आयटकचे ज्येष्ठ नेते कॉ. मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय निरीक्षक कॉ. सुकुमार दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. राज्य कोषाध्यक्षपदी प्रकाश बनसोड यांची तर सचिवपदी राजू देसले, बबली रावत (मुंबई), सदाशिव निकम, (कोल्हापूर)मिलिंद गणवीर (गोंदिया), कृष्णा भोयर (रायगड) दिलीप उटाणे (वर्धा), विनोद झोडगे (वर्धा), शंकर पुजारी (सांगली), तानाजी खराडे (पुणे) यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...