आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटकच्या 19 व्या राज्य अधिवेशनाचा समारोप:राज्याध्यक्षपदी सी. एन. देशमुख, सरचिटणीसपदी श्याम काळे

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) च्या तीन दिवसीय 19 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा आज उत्साहात समारोप झाला. या अधिवेशनात राज्यभरातील 92 प्रतिनिधींची नवीन राज्य कौन्सिल सदस्यांची निवड करण्यात आली.

यांची झाली निवड

आयटकच्या राज्याध्यक्षपदी कॉ. सी. एन. देशमुख यांची; तर कॉ. श्याम काळे यांची सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते कॉ. मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय निरीक्षक कॉ. सुकुमार दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.

संघटनेच्या राज्य कोषाध्यक्षपदी प्रकाश बनसोड यांची, तर सचिव राजू देसले,( नाशिक) बबली रावत( मुंबई), सदाशिव निकम, ( कोल्हापूर)मिलिंद गणवीर,( गोंदिया) कृष्णा भोयर,( रायगड) दिलीप उटाणे( वर्धा), विनोद झोडगे,( वर्धा) शंकर पुजारी,( सांगली) तानाजी खराडे ( पुणे)यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य उपाध्यक्ष म्हणून प्रा. राम बाहेती, बी. एन. जे. शर्मा, जोसेफ , माधुरी क्षिरसागर, महेश जोतराव, उदय चौधरी, एस. बी. पाटील, सुमन पुजारी, नामदेव चव्हाण, सुधीर टोकेकर, अमृत महाजन, हौसलाल रहागंडाले यांची निवड करण्यात आली. राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून नाशिक जिल्ह्यातिल सखाराम दुर्गुडें, व राज्य कौन्सिल सदस्य म्हणून सुनीता कुलकर्णी, अनिल बुचकूल, दत्तू तुपेयांची निवड करण्यात आली

राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या विकृत विधानाचा तीव्र निषेध या अधिवेशनात करण्यात आला. हा निषेधाचा ठराव मांडताना आयटकचे राज्याध्यक्ष सी. एन. देशमुख व ज्येष्ठ नेते प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सत्तेवर बसण्याचे स्थान मिळाले, ते संविधान सामान्य माणसाच्या त्याग्यातून, बलिदानातून तयार झाले आहे. मात्र स्वतःला संस्कार संपन्न परंपरेत राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या विकृत विधानाचा आयटक आणि कष्टकरी जनता तीव्र निषेध करते.

बातम्या आणखी आहेत...