आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जात असल्याने माध्यमांतून सर्व घडामोडींचा आशय पारदर्शकपणे, योग्य पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. राष्ट्रहितार्थ मूल्यांची रुजवणूक हीच या समाजमाध्यमांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. विश्व संवाद केंद्र आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधत डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय माध्यम संवाद परिषद झाली. "माध्यमाचा गैरवापर आणि माध्यमाची ताकद’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे हे उपस्थित होते. सोलापूरकर म्हणाले की, चित्रपटांनी, वृत्तपत्रांनी अर्थकारण, मनोरंजन यांना अवास्तव महत्त्व देऊन राष्ट्रीय विचारांपासून, वास्तवापासून माध्यमांना दूर नेले आहे. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना सर्व समाजमाध्यमांनी स्वत:चे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे, असेही त्यांनी व्यक्त केले. अभय कुलकर्णी यांनी विश्व संवाद केंद्राच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. परिषदेचा समारोप सत्राचे पुष्प पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी गुंफले. ते म्हणाले की, ‘स्वराज्य ७५’ या संकल्पनेंतर्गत चर्चासत्रे, वक्तृत्व, पथनाट्ये आदी माध्यमातून जनजातीचे स्वातंत्र्य आंदोलन समाजासमोर उभे रहावे. हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुप्रिया देवघरे, मंदार ओलतीकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.