आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जाचे आवाहन:पुणे विद्यापीठ वर्धापन दिन पुरस्कारासाठी अर्जाचे आवाहन

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदाच्या वर्षीही हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून इच्छूकांकडून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. नाशिकसह अहमदनगर व पुणे िजल्ह्यातील शैक्षणिक संस्थांतील इच्छूक या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतील.

पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, अध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल, नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी, विशेष उपक्रम व संशोधन, विद्यापीठ विभाग आदी पुरस्कार प्रदान केले जातात. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अध्यापकांचाही या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांकडून सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इच्छूकांनी येत्या सोमवार (दि.२८) नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पुरस्कारासाठी अर्ज करायचे आहेत. याविषयीचा अधिक तपशील विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...