आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थान येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी पाठवण्यात येणाऱ्या ८५ उंटांची गुरुवारी सुटका केल्यानंतर शुक्रवारी मखमलाबाद परिसरातून आणखी २९ उंट ताब्यात घेण्यात अाले. हे उंटदेखील हैदराबादला पायी वाहतूक करून नेले जात असल्याची माहिती अॅनिमल वेल्फेअरच्या कार्यकर्त्यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी ८४ उंटांना चुंचाळे येथील पांजरापोळ संस्थेत पाठवण्यात अाले.
नक्की प्रकरण काय?
राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी जात असल्याचा संशय अॅनिमल वेल्फेअरने पुरुषोत्तम आव्हाड यांनी व्यक्त केला होता. हे उंट राजस्थान येथून गुजरातमार्गे महाराष्ट्रात आले. धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी एवढ्या संख्येने उंट जात असताना चौकशीदेखील केली नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. शहर पोलिसांकडूनही कारवाई झाली नाही.
आव्हाड यांनी पांजरापोळ प्रशासनाशी संपर्क साधत या ८४ उंटांना निवारा देण्याची विनंती केली. पांजरापोळ संस्थेने होकार देत या उंटांना चुंचाळे येथे ठेवण्याची तयारी दर्शवली. सायंकाळी मखमलाबाद परिसरात २९ उंट असल्याची माहिती अाव्हाड यांना मिळाली. वाहतूक करणाऱ्यांनी उंट हैदराबाद येथे नेत असल्याची माहिती दिली. अॅनिमल वेल्फेअरचेे पुरुषोत्तम आव्हाड यांनी समयसूचकता दाखवत या उंटांसाठी धडपड सुरू केली. याप्रसंगी उपस्थित पुरुषोत्तम आव्हाड, नानासाहेब घाेडके, डाॅ. वाणी, श्रीमती प्रजापती, प्रांजल मालपुरे, वेदांत तिदमे उपस्थित होते.
उंट कत्तलीसाठी पाठवल्याचा दावा
राजस्थान येथून दोन दिवसांत तब्बल ११४ उंट आल्याने एवढ्या संख्येने उंट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे उंट हैदराबाद येथे का पाठवले जात हाेते असा प्रश्न आहे. याबाबत पोलिसांकडून ठोस माहिती मिळाली नाही. मात्र, अॅनिमल वेल्फेअरकडून हे उंट कत्तलीसाठी पाठवले जात असल्याचा दावा केला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.