आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर येथे कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; तोंडाला मास्क लावून केली चोरी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाट्याजवळ असलेल्या विठ्ठल कॉम्प्लेक्स मधील कॅनरा बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यान फोडले आहे. ओझर हून नाशिककडे जाताना डाव्या बाजूस कॅनरा बँकेची शाखा आहे आणि त्याला लागून एटीएम देखील आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्क लावून दोन चोरट्यांनी मशीन फोडले.

नेमकी घटना काय?

मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाट्याजवळ असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये आधी एक जण आत शिरला आणि काही वेळाने बाहेरची परिस्थिती सुमसामा पाहून दुसऱ्याने आत प्रवेश केला.त्यांनी हातातील लोखंडी वस्तूच्या आधारे मुख्य दार फोडले. परंतु बँकेंना फोन लोगोपाट तीन दिवस सुट्ट्या असल्याने मशीन मध्ये रक्कम सापडून आली नाही. दरम्यान सकाळच्या सत्रात एक ग्राहक जेव्हा पैसे काढायला गेला तेव्हा त्याला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर स्थानिक जागा मालकांनी बँकेच्या व्यवथापकांना संपर्क केला. त्यानंतर सबंधित अधिकारी आल्यानंतर पोलिसांनी इतर बाबी तपासल्या

त्यात सीसीटिव्ही फुटेज देखील तपासून ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी उशिरा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. स्थानिक प्रबंधक तृषिता आचार्य यांच्याशी अधिक माहिती घेतली असता त्यांनी मशीनचे मोठे नुकसान झाले असून बँक एटीएम मध्ये किती रक्कम होती आणि मधल्याकळत किती रक्कम काढली गेली याचा तपशील लवकरच मिळेल असे सांगितले. ओझर पोलिसांनी सदरचा परिसर सिल केला असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.