आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गट चर्चेद्वारे 250 विद्यार्थ्यांकडून कॅन्सर जनजागृती‎‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मोतीवाला नॅशनल‎ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज‎ आणि हॉस्पिटलच्या राष्ट्रीय सेवा‎ याेजनेंतर्गत ताेंड व स्तनाच्या कॅन्सर‎ बाबत जनजागृती रॅली काढण्यात‎ आली. या रॅलीत सुमारे २५० शिकाऊ डाॅक्टर असलेले विद्यार्थी सहभागी‎ झाले हाेते. डाॅक्टरांनी शाळांमध्ये‎ जाऊन गट चर्चेव्दारे विद्यार्थीनींशी‎ संवाद साधला.‎ सध्या मुलांमध्ये तंबाखुजन्य‎ पदार्थांच्या सेवनामुळे ताेंडाच्या‎ कॅन्सरचे प्रमाण वाढतआहे. तर‎ महिलांना स्तनाच्या कॅन्सरचा सामना‎ करावा लागत आहे. कॅन्सरचा‎आजार लवकर आेळखण्यात यावा‎ यासाठी मोतीवाला नॅशनल‎ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज‎ आणि हॉस्पिटलच्या राष्ट्रीय सेवा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याेजनेच्या वतीने तोंडी आणि स्तन‎ कर्करोग जनजागृती कार्यक्रम हाती‎ घेण्यात आला आहे.

या अभियानात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ २५० विद्यार्थ्यांसह दाेन शिक्षकांनी‎ सहभाग घेतला हाेता. या‎ कार्यक्रमांतर्गत गंगापूर येथील दे. ना.‎ पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांसह‎ गावातून रॅली काढण्यातआली.‎ तसेच कॅन्सर लवकर‎आेळखण्यासाठी व विद्यार्थीनींमध्ये‎ स्तन तपासणी करण्यासाठी गट चर्चा‎ करण्यातआली. एका विद्यार्थीनीने‎ समाजातील कमीत कमी १०‎ महिलांपर्यंत संदेश पाेहाेचवावा असे‎आवाहन माेतीवालाचे प्राचार्य एफ.एफ.‎ माेतीवाला यांनी केले. डाॅ. स्वानंद‎ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली हा‎ उपक्रम राबविण्यातआला. कॅन्सर हा‎ अजाार कशामुळे हाेेताे? याची माहिती‎ प्रत्येकास हवी. यासाठीआहार,‎ दिनचर्या याचे नियम पाळावे, असे‎आवाहन देखील रॅलीतून करण्यात‎आले. यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त‎ प्रतिसाद लाभला.‎

बातम्या आणखी आहेत...