आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:कॅन्टोन्मेंट निवडणूक; मतदार यादीत‎ घाेळ, बदलासाठी नागरिकांची गर्दी‎

देवळाली कॅम्प‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची‎ निवडणूक जाहिर झाल्यानंतर मतदार‎ यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी‎ नागरिकांनी गर्दी केली आहे. शुक्रवारी‎ (दि. ३) मतदार नोंदणी करण्यासाठी‎ अंतिम मुदत देण्यात आली होती.‎ त्यामुळे साडेतीन हजाराहून अधिक‎ नागरिकांनी अर्ज कार्यालयात जमा‎ केले आहे. मतदार यादी तयार करतांना‎ बहुतांश चुका झाल्या आहेत, यामध्ये‎ मतदारांचे वय अधिक झाले आहे, तर‎ काहींचा पत्ता बदलला गेला आहे.‎ देवळाली कॅन्टोन्मेंटची निवडणूक ही‎ २८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात‎ आली असून तीन मार्चपर्यंत मतदार‎ नावे टाकण्यासाठी मुदत देण्यात‎ आलेली होती.

यादीवर हरकती‎‎‎‎‎‎‎‎‎ घेण्यासाठी आठ मार्चपर्यंत मुदत‎ असून त्याची रितसर सुनावणी १० मार्च‎ ते १३ मार्च यादरम्यान होणार आहे. १४‎ मार्च रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष‎ हरकतींवर निर्णय जाहीर करणार‎ असून सदर निर्णयाविरोधात १७‎ मार्चपर्यंत नागरिकांना अपील करता‎ येणार आहे. २० मार्चरोजी अपीलावर‎ सुनावणी होऊन निर्णय होणार आहे.‎

तसेच २३ मार्च रोजी उमेदवारी अर्ज‎ दाखल करण्यात येणार आहे. २८‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्चला अर्जांची छाननी, २९ मार्चला‎ माघार, ६ एप्रिल रोजी निवडणूक‎ लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप,‎ २४ एप्रिलला संबंधितांना बॅलेट पेपर‎ पाठविण्यात येतील.‎ ३० एप्रिलला सकाळी सात ते‎ सांयकाळी पाच वाजेपर्यंत मतदान‎ होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी‎ होणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे‎ अध्यक्ष ब्रिगेडियर ए. रागेश यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...