आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे आयोजन:वंदे मातरम‌ प्रतिष्ठानतर्फे कॅप लाॅन टेनिस चॅम्पियन स्पर्धा

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंदे मातरम‌् प्रतिष्ठान आणि टेनिस लीग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्रीमती छाया अरविंद पत्की यांच्या स्मरणार्थ कॅप लॉन टेनिस चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद‌्घाटन जिल्हा टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव देशपांडे, एनडीटीएचे सहसचिव डॉ. संजय पिचा, वंदे मातरम‌् प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी, प्रसाद पत्की, विशाल साळवी यांच्या हस्ते झाले. माजी महापाैर सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद पत्की आणि शलाका पत्की यांच्याकडून उत्कृष्ट खेळाडू म्हणून भूमी भालेराव या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन गोविंद साळुंखे, अशोक दाभाडे, सान्वी तडसकर आदींनी पाहिले.

बातम्या आणखी आहेत...