आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:आरोग्य विद्यापीठाची विभागीय कार्यालये संलग्नित महाविद्यालयांशी जोडली; विद्यार्थांना नाशिकमध्ये जाण्याची गरज नाही

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाची विभागीय कार्यालये कार्यान्वीत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यांगतांना आता प्रशासकीय कामासाठी विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयात येण्याची गरज राहणार नसल्याने विद्यापीठाच्या विभागीय कामांमध्ये यामुळे सक्षमता येणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर व कोल्हापूर येथील विविध प्रशासकीय, शैक्षणिक व परीक्षाविषयक कामकाजासाठी विभागीय कार्यलये सक्षम करण्यात आली आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यांगतांना प्रशासकीय कामकाज करतांना अंतर सोईचे व्हावे तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन सामन्य कामाकरीता नाशिक मुख्यालयात येण्याची गरज पडू नये याकरीता विभागीय कार्यालये अधिक सक्षम करण्यात आली आहेत. विद्यापीठाची ही विभागीय कार्यालय जवळच्या संलग्तित महाविद्यालयांशी जोडण्यात आली आहेत.

410 हून अधिक महाविद्यालये संलग्नित

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणाच्या विविध विद्याशाखांचे राज्यातील सुमारे 410 पेक्षा अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर व कोल्हापूर येथे सुविधा उपलब्ध हाेणार असल्याने सर्वांचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होईल असा विद्यापीठाचा मानस आहे. तसेच विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर परिपत्रक क्र. 01/2022 मध्ये स्थानिक महाविद्यालय कोणत्या विभागीय केंद्राशी जोडण्यात आली आहेत यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

सर्व संलग्नित महाविद्यालयांना माहिती

महाविद्यालय जवळच्या विभागीय केंद्राशी जोडण्याबाबत सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांना विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. तसेच याबाबत अभ्यागतांनी आपल्या प्रतिक्रिया विद्यापीठास administration@muhs.ac.in या मेल आयडीवर पाठविण्यात याव्यात असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...