आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार पलटली, पखालरोडचे ७ जखमी; गंगापूर राेडवर ट्रकची हुलकावणी कार चक्काचूर

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर धरणाकडे पर्यटनासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणींच्या कारला भरधाव ट्रकने हुलकावणी दिल्याने कार रस्त्याच्या कडेला तारेच्या कंुपणावर आदळत खड्ड्यात गेली. यात कारचा चक्काचूर झाला. बुधवारी (दि.३) सायंकाळी पाच हा अपघात झाला. यात पखालराेडवरील सात जण जखमी असून त्यातील दाेघांची प्रकृती गंभीर असल्याचे पाेलिसांनी सांगितले. दाेघांवर जिल्हा रुग्णालयात तर अन्य दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या अपघातात तीन मुली आणि चार तरुण जखमी झाले. कारचालक तनवीर मन्सुरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात कोमल नामक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक काेंडी झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...