आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळी जेरंबद:कार विक्री करणारी टोळी जेरबंद

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राज्यातून वाहन चोरी करून शहरात विक्री करणारी टोळी जेरंबद करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने कारसह तीन संशयितांना अटक केली. सोमवारी आडगाव जकात नाका येथे पथकाने ही कारवाई केली. पिंकल श्रावण पाडवी, जसवंत रमेश वसावा, रुस्तम नगीनभाई वसावा असे या कारचोरी करणाऱ्या टोळीतील संशयिताची नावे आहे. एक साथीदार मोहन वसावा फरार झाला.

गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असताना गुजरात येथून कार विक्री करण्यासाठी शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने आडगाव जकात नाका येथे सापळा रचला. माहितीच्या आधारे संशयित कार जकात नाक्यासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसली. कारमध्ये चार इसम बसलेले आढळून आले. पथकाने कारला घेरून तिघांना ताब्यात घेतले. एक संशयित झटापट करून पळाला. कारच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, शंकर काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुजरात राज्यातील नसारपूर येथून कार चोरी केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...