आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲम्ब्युलन्स भेट:भारतीय स्टेट बँकेच्या सीएसआर निधीतून सप्तशृंगी ट्रस्टला कार्डियाक ॲम्ब्युलन्स भेट

कळवण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गड ट्रस्टला भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक कार्यालयातर्फे सीएसआर फंडातून कार्डियाक ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आली. या ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर वर्षातून दोनदा यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी देवस्थानतर्फे धर्मार्थ रुग्णालय सुरू आहे. भाविकांसाठी २४ तास मोफत आरोग्यसेवा सुरू असते. मात्र, सोयी सुविधायुक्त कार्डियाक ॲम्ब्युलन्स नव्हती. ही बाब हेरून स्टेट बँकेच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने सीएसआर निधीतून कार्डियाक ॲम्ब्युलन्स भेट दिली. लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिपनकुमार दत्ता यांच्या पत्नी जुम्मा दत्ता, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष न्यायाधीश वर्धन देसाई, तहसीलदार बंडू कापसे, स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, उप महाव्यवस्थापक मुकेश कुमार, क्षेत्रीय व्यवस्थापक सुशीलकुमार, नीलेश तुपेरे, विश्वस्त ललित निकम, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे, प्रकाश जोशी, शाम पवार, सरपंच रमेश पवार, संदीप बेनके, राजेश गवळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...