आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारंपरिक अभ्यासक्रमांसह वेगळ्या करिअरच्या वाटा जाणून घेत शहरातील विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअरच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. दहावी बारावीच नव्हे तर पदव्युत्तर पदवी विद्याशाखांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांतील करिअरचे पर्याय असो की, फॅशन डिझायनिंग, अॅनिमेशन, इंटेरिअर डिझायनिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट अशा वेगळ्या वाटांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने करिअर निवडीचा मार्गही अधिक प्रशस्त झाला. ‘दिव्य मराठी’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनास शहरातील विद्यार्थी पालकांचा शनिवारी (दि. ४) जूनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी (दि.५) अखेरचा दिवस असल्याने जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी व पालकांना प्रदर्शनाला भेट देऊन करिअरच्या विविध संधींची माहिती घेण्याची संधी असेल. करिअरच्या वेगवेगळ्या वाटांची माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका हॉल येथे ३ ते ५ जून दरम्यान ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने भेट देत करिअरच्या विविध पर्यायांची माहिती जाणून घेतली. करिअरच्या निवडीनंतर आता खऱ्या अर्थाने ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉद्वारे भाग्यवंत विजेत्यांना गिफ्ट देण्यात आले.
कौशल्याधीष्ठित शिक्षण हीच काळाची गरज
दहावी व बारावीनंतर पारंपरिक शिक्षण घेतल्यास पुढे करिअरच्या संधी मर्यादित असल्याने अनेक विद्यार्थी बेरोजगार राहतात. त्यामुळे कौशल्याधीष्ठित शिक्षण हेच आजच्या काळाची गरज असल्याचे राजीव घोडे (पुणे) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. ‘एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’ मध्ये ‘कौशल्याधारित पदवी अभ्याक्रमाद्वारे करिअरच्या संधी’ या विषयावर राजीव घाेडे यांनी मार्गदर्शन केले. पालकांनीही आपल्या मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांना त्या-त्या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले तर विद्यार्थी यशस्वी करिअरच्या दिशेने जाऊ शकतील. आजच्या आधुनिक काळातील इंजिनिअरिंग तसेच स्मार्ट तंत्रज्ञानामुळे करिअरच्या अनेक संधी निर्माण होत असल्याने या करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे प्रा. राजीव घोडे यांनी सांगितले. त्यांनी नव्या करिअरच्या पर्यायांची माहिती, अभ्यासक्रमांचे स्वरूप, पात्रता, नोकरी व व्यवसायाच्या संधी, स्पर्धा परीक्षांतील संधी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत काही टिप्स दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.