आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:इंडक्शन प्रोग्रामद्वारे हॉटेल इंडस्ट्रीतील करिअरची माहिती ; युवकांना शारीरिक तंदुरुस्तीचे धडेही

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटन आणि हॉटेल उद्योगाचा परिचय करून देताना युवा वर्गात संभाषण कौशल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. योग्य खाण्याच्या सवयी देखभाल, शारीरिक तंदुरुस्ती याद्वारे युवकांनी आपले जीवन समृद्ध करावे, असा संवाद हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी साधताना या क्षेत्राशी निगडीत तज्ञांनी साधला. इंडक्शन प्रोग्रामद्वारे हाॅटेल मॅजेजमेंट अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांना हॉटेल इंडस्ट्रीचे स्वरुप व भविष्यातील संधीची माहिती मिळाली.

महात्मा गांधी विद्या मंदिरच्या समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीच्यावतीने प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ दिवसांचा इंडक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एआयसीटीईने विहित केलेल्या नियमांनुसार आणि मॉड्यूल्सनुसार इंडक्शन आयोजित केले जाते. सात दिवसांच्या या कार्यशाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात अभ्यासक्रमाचा सामान्य परिचय, महाविद्यालयाची माहिती, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी ओळख, संभाषण कौशल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी कुंदा महाजन, संवाद कौशल्याचे महत्त्व सांगितले. प्राची म्हसकर आणि डॉ. रोहित बोर्लीकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सरचिटणीस प्रशांतदादा हिरे, समन्वयक अपूर्व हिरे, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप सराफ यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...