आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर संधी:विज्ञान, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करिअर संधी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे विद्यापीठाच्या सेंटर फाॅर एनर्जी स्टडीजच्या वतीने ‘हायड्रोजन एनर्जी सिस्टिम’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून हायड्रोजन सेक्टरमधील विविध विषयात विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना करिअर आणि संशोधन क्षेत्रातील संधी, नवीन माहिती मिळण्यास मदत होईल. सेंटर फाॅर एनर्जी स्टडीजद्वारे नाव नोंदणीही सुरू असल्याने संबंधितांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठातील एनर्जी स्टडीज केंद्रात ही कार्यशाळा दिनांक १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान होणार असून संशोधन संस्थांमधील तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना या विषयातील सखोल माहिती, विविध संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यशाळेतील व्याख्यानांचे नियोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी ऑनलाइन पूर्वनोंदणी आवश्यक असून ही कार्यशाळा प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठी सशुल्क आहे. यासाठी निवडक ३० जागा असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे याचे प्रवेश केले जाणार आहेत. माहितीसाठी एनर्जी स्टडीज केंद्रातील सहायक प्रा.डॉ. अनघा पाठक ९८२३०२१०६६ व डॉ. एस. पी. देनाव ९५४५६४८४९६ यांच्याशी संपर्क करावा, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...