आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईची झळ:गाजराने केक कापत आंदोलन; ‘राष्ट्रवादी युवक’कडून सरकारचा निषेध

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेले दर, सिलिंडरमुळे गृहिणींचे कोलमडलेले अंदाजपत्रक आदींसह विविध वस्तूंचे दर भडकल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली भारतनगर येथील पेट्रोलपंपांवर गाजराने केक कापत आंदोलन केले गेले. यावेळी “एक ही भूल, कमल का फुल”, “अबकी बार, पेट्रोल-डिझेल शंभरी पार” अशा घोषणा देण्यात आल्या.

पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर हळूच विविध वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्या. या मुद्यावरून राष्ट्रवादी युवकने आंदोलन केले. यावेळी खैरे म्हणाले की, केंद्र सरकार दिवसेंदिवस इंधनासह गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करत आहे. सिलिंडरचे दर वाढवले जात असून दीड वर्षापासून सबसिडी बंद केली गेली. आधीच खाद्यतेलाच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

यावेळी शादाब सय्यद, जय कोतवाल, डॉ. संदीप चव्हाण, सुनील घुगे, सोनू वायकर, राहुल कमानकर, सागर बेदरकर, रेहान शेख, संतोष गोवर्धने, तुकाराम फसाटे, नीलेश खोडे, अभिषेक सराफ, यश खरात, धीरज साळवे, रोहन साळवे, चैतन्य खरात, कन्नूर शहा, मयूर लोखंडे, शहात अरब, अमोल जाधव, विक्की गांगुर्डे, मयूर निकम, रजा शेठ, सचिन झोले, आदिल खान, नदिम शेख, वाजिद शेख आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...