आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) ची रविवारी (ता. १९) परीक्षा होणार आहे. मात्र या परीक्षेसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कॉपी होत असल्याची प्रकरणे उघड झाली आहे. त्यामुळे ही परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात घेतली जावी असे साकडे मनसेने शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांना घातले आहे. एनएमएमएस ही शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्रात ही परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. यात मेरिट पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत काही अटींच्या अधीन राहून दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. गेल्या पाच सहा वर्षांचा अनुभव पाहता जिल्ह्यात ग्रामीण भागातील पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा आणि सिन्नर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रुप कॉपीचे प्रकार घडले आहे. त्यामुळे या तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात.
परिणामी शहरासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही हुशार विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी सामूहिक कॉपी करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी, उमेश भोई, जिल्हाअध्यक्ष कौशल पाटील, शहराध्यक्ष ललित वाघ, नितीन धानापुणे, मेघराज नवले, दीपक बोराडे हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.