आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हसीजीएसटी, रेल्वे, लष्करातील बडे मासे गळाला:सीबीआयच्या एसीबीने वर्षात 34 लाचखाेरांभोवती आवळला फास

नीलेश अमृतकर | नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार राेखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सापळे रचून अटकेची कारवाई केली जात असतानाच त्याच धर्तीवर गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यालयांमधील भ्रष्टाचार राेखण्यासाठी कार्यरत सीबीआयच्या एसीबी पथकाने नाशिकसह मुंबईत तब्बल ३४ सापळे यशस्वी केले आहेत. विशेष म्हणजे या पथकाने जीएसटीचे अधीक्षक, भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव पदाच्या रेल्वे अधिकाऱ्यासह लष्करातील बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले.

नाशिकसह मुंबईचे कार्यक्षेत्र असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या वतीने स्वतंत्रपणे केंद्र सरकारच्या अखत्यातारीतील कार्यालयांमध्ये सापळे रचले जात आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना व वेगवेगळ्या विभागांत कामे प्रलंबित ठेवून लाच मागणाऱ्यांविराेधात कारवाई केली जात आहे. केंद्रीय कार्यालयातील भ्रष्टाचार राेखण्यासाठी पथकाकडून जनजागृती केली जात आहे. तक्रारदारांनी माेबाइल अथवा व्हाॅट्सअॅपवर देखील अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास तक्रारीची शहानिशा करून तातडीने कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, या पथकाने २०२२ मध्ये वर्षभरात मुंबई व नाशिक विभागातच २४ लाचखाेरांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविराेधात संबंधित पाेलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यापाठाेपाठ गेल्या दाेनच महिन्यांत ९ लाचखाेरांना पकडून गुन्हे दाखल केले आहेत. पथकाचे वरिष्ठ अधीक्षक यांच्या मार्गदशर्नाखाली रणजितकुमार पांडे यांनी या कारवाया केल्या आहेत. या पथकामुळे केंद्रीय कार्यालयांमधील जनजागृतीमुळे तक्रारदारांचा आेघ वाढत असून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पथकाने नाशिकसह मुंबईत तब्बल ३४ सापळे यशस्वी केले
या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश

भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव पदाच्या समकक्ष असलेल्या रेल्वेतील प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता ए.एस. गुप्ता यांना कंत्राट मंजुरीच्या माेबदल्यात तर नवी मुंबईचे सीजीएसटीचे अधीक्षक ए.के. राव यांना १० लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. नाशिकमध्ये सीजीएसटीचे उपआयुक्त तथा अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यास बंद पडलेले जीएसटीचे खाते सुरू करण्याच्या माेबदल्यात लाच घेताना तर देशाच्या संरक्षण विभागातील काॅम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेतील सहायक अभियंता मेजर हिमांशू मिश्रा व कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना १ लाख २० हजारांची लाच घेताना अटक केली हाेती.

या क्रमांकावर बिनधास्त करा तक्रार
^रेल्वे, लष्करातील तीनही विभाग, लेखा कार्यालये, सीजीएसटी, कस्टम, केंद्रीय अन्नधान्य महामंडळ, बीएसएनएल, टपाल, भविष्य निर्वाह निधी, वन विभाग, प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी, सीएनपी) कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अधिकृत काम करण्यासाठी अथवा विनाकारण प्रकरण प्रलंबित ठेवून पैशांची मागणी केल्यास केंद्रीय अन्वेषण ब्युरो, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, मुंबई या ठिकाणी अथवा ०८७५०३९४७७७, ८४३३७००००० , ०२२- २६५४३७०० , ई मेल आयडी- sp1acmum@cbi.gov.in संपर्क साधावा.
रणजितकुमार पांडे, पोलिस निरीक्षक, सीबीआय

बातम्या आणखी आहेत...