आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • CBS To Nashikroad Dhamma Upasak Mahashramner Grand Rally | Welcomed With Excitement Everywhere, Eye catching Live Appearances Of Legends In Attractive Pictures

सीबीएस ते नाशिकरोड धम्म उपासक महाश्रामनेर भव्य रॅली:ठिकठिकाणी उत्साहात स्वागत, आकर्षक चित्ररथात महापुरुषांचे लक्षवेधी सजीव देखावे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महा बौद्ध धम्म मेळावा आणि महा श्रामणेर शिबिराच्या निमित्ताने शनिवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत 1 हजार धम्म उपासक व श्रामणेर यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये बुद्ध गीते आणि भीम गीते लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

शालिमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, शालिमार चौक, द्वारका, उपनगर, बिटको, नाशिक रोड मार्गे तक्षशिला शाळा येथे आली या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला.

सर्वांचेच आकर्षण ठरले

आकर्षक फुलांनी सजावट केलेल्या रथात सर्वात पुढे भगवान गौतम बुद्धाचा भव्य पुतळा एका रथावर ठेवण्यात आला होता, तर त्यामागोमाग रथावर भगवान बुद्धाचा सजीव देखावा साकारण्यात आला होता, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा, मग देखावा महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा सजीव देखावा होता. सदर लक्षवेधी देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले होते.

आदींचा सहभाग

दरम्यान, शहरातील विविध ठिकाणी या रॅलीत सहभागी उपासक व श्रामणेरांचे स्वागत करण्यात आले, मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीमध्ये भन्ते ज्ञानज्योती, भन्ते नागसेन, भन्ते धम्मरत्न, भन्ते बोधीपाल, भन्ते महामोगलान, भन्ते सारीपुत्र, भन्ते कौटीण्य आदी सहभागी झाले होते.

धम्माचा प्रचार, प्रसार व्हावा

शिबिरांच्या माध्यमातून विज्ञान वादी धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठीशिबिराचे संयोजकांनी आयोजन केलेले आहे. आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन आढांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, के.के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ आदी संख्येने सहभागी झाले होते आहेत.

बातम्या आणखी आहेत...