आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई 12 वी:70 हजारपेक्षा अधिक मुलांना प्रथमच 95% पेक्षा जास्त गुण, विनापरीक्षा 99.37% मुले उत्तीर्ण

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

,सीबीएसईने शुक्रवारी १२ वीचा निकाल जाहीर केला. कोरोनामुळे परीक्षा न देताच १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपैकी ९९.३७% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२० च्या तुलनेत ते १०.५९% जास्त आहेत. तेव्हा कोविडमुळे परीक्षा मध्येच रद्द करण्यात आली होती. त्याआधी प्री-कोविड वर्षाच्या म्हणजे २०१९ च्या (जेव्हा सामान्यपणे परीक्षा आयोजित झाली होती) तुलनेत हा निकाल १६% जास्त आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उत्तीर्ण टक्केवारी असलेला निकाल आहे. निकालामुळे असमाधानी असलेल्या मुलांना नंतर परीक्षा देण्याची संधी मिळेल. ११.५१% (१,५०,१५२) विद्यार्थ्यानी ९०% पेक्षा जास्त, तर एकूण ५.३७% विद्यार्थ्यांनी (७०,००४) ९५% पेक्षा जास्त गुण मिळवले. २०२० मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या १,५७,९३४ म्हणजे १३.२४% होती, तर ९५% गुण मिळवणारे विद्यार्थी ३८,६८६ म्हणजे ३.२४% होते. २०१९ मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या ९४,२९९ होती. १७,६९३ विद्यार्थ्यांनाच ९५% पेक्षा जास्त गुण मिळवले होते. यंदा ९९.६७% मुली आणि ९९.१३% मुले उत्तीर्ण झाले. केंद्रीय विद्यालयाची १०० टक्के मुले उत्तीर्ण झाली. १०६० शाळांचा डेटा न मिळाल्याने ६५,१८४ विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित आहे. त्यांचा निकाल ५ ऑगस्टला जाहीर होईल, असे मंडळाने म्हटले आहे.

भास्कर विश्लेषण : बिहार-झारखंडचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडतील
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बहुतांश राज्यांनी या वर्षी १२ वीची बोर्ड परीक्षा रद्द केली होती. निकालाचा फॉर्म्युलाही बहुतांश राज्यांनी सीबीएसईच्या धर्तीवरच ठेवला होता. त्यात १० वी आणि ११ वीच्या गुणांचे ३०-३०% आणि १२ वीच्या इंटर्नल असेसमेंट व प्रॅक्टिकलला ४०% चे वेटेज देण्यात आले होते. सीबीएसईने ११.५१% विद्यार्थ्यांना ९०%+ गुण दिले, पण अनेक राज्ये त्यात मागे पडली...

२०९४ मुले यंदाही अनुत्तीर्ण : सीबीएसईने १२ वीच्या १३,०४,५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला, त्यापैकी १२,९६,३१८ विद्यार्थी पास झाले. ६१४९ विद्यार्थी कंपार्टमेंट श्रेणीत, म्हणजे ही मुले ५ मुख्य विषयांपैकी एकात अनुत्तीर्ण आहेत. २०९४ विद्यार्थी असे आहेत जे एकापेक्षा जास्त विषयांत फेल झाल्याने या श्रेणीतूनही बाहेर.

स्पर्धा परीक्षांत अडचण नाही, डीयूच्या कॉलेजची स्पर्धा कठीण... तेथे २०२० मध्ये इकॉनॉमिक्सचा कटऑफ ९९% होता
शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक पांडेय म्हणाले की, उत्तीर्णांची टक्केवारी वाढल्याचा नीट, जेईई यांसारख्या स्पर्धा परीक्षांत विशेष परिणाम होणार नाही. पण डीयूच्या कॉलेजमध्ये प्रवेश कठीण होईल. गेल्या वर्षीच तिथे इकॉनॉमिक्स व इंग्रजीत कटऑफ ९९% पर्यंत गेला होता. यंदा डीयूत ६९,५५४ जागा आहेत. त्यापैक्षा जास्त तर फक्त सीबीएसईत ९५%+ गुण घेणारे विद्यार्थी आहेत. सायन्स वगळता दोन तृतीयांश मुलांना डीयूसारख्या संस्थेत प्रवेश हवा असेल. त्यामुळे ९५% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्यांना स‌र्व मुलांनाही प्रवेश कठीण आहे. ९० %+ गुण असलेल्यांना अडचण असेल. बिहार-झारखंडची मुले मागे पडतील.

- पुणे १० व्या स्थानावरून ८ व्या स्थानी आले. भोपाळ ९ व्या स्थानी कायम. गुवाहाटी १३ वरून १० व्या स्थानी आले. अजमेर, नोएडा ११ व १२ व्या स्थानी कायम. - सीबीएसईने २०२० मध्ये ३८,६८६ मुलांना ९५%+ गुण दिले. यंदा ही संख्या जवळपास दुप्पट झाली. - राजस्थान बोर्डाने सुमारे १०% म्हणजे ८० हजारपेक्षा जास्त मुलांना ९५%+ गुण दिले. - बिहार बोर्डात कोणाला ९५%+ गुण नाही. फक्त २२ जणांना ९३%+ गुण.

बातम्या आणखी आहेत...