आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमापूजन:सी.डी.ओ. मेरी हायस्कूलमध्ये प्रतिमापूजन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक संचलित सी.डी.ओ. मेरी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील सबनीस होते. प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक चिमण सहारे, पर्यवेक्षिका सुरेखा सोनवणे, शिक्षक मंडळ सदस्य दिलीप अहिरे उपस्थित होते. इयत्ता सहावी (क) च्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.यावेळी तेजश्री पवार व शिवप्रिया गव्हाणे तसेच शिक्षक प्रतिनिधी दिलीप अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

समृद्धी वाघ, तेजश्री पवार, धनश्री विखणकर, समीक्षा थेटे, दीपिका साळुंखे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ, मातोश्री रमाबाई आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा करून त्यांनी दिलेला संदेश उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. स्वागत व प्रास्ताविक इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी उन्नती चौरे हिने केले. द्रोणाक्षी दहिवाड हिने सूत्रसंचालन केले तर स्वाती वाघिरे हिने आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सारिका सूर्यवंशी, दीपमाला चौरे, कविता खोटरे यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...