आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धेचे उद‌्घाटन:सीडीओ मेरी शाळेत हिवाळी क्रिडा स्पर्धा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद‌्घाटन जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या हस्ते झाले.प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक खेळात हभागी झाले पाहिजे व उत्तम पद्धतीने खेळले पाहिजे. खेळामुळे खिलाडूवृत्ती अंगी बांधली जाते, असे प्रतिपादन क्रीडा शिक्षक त्र्यंबकराव तिडके यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील सबनीस होते. यावेळी शिक्षक मंडळ सदस्य दिलीप अहिरे, मुख्याध्यापक मधुकर पगारे पालक शिक्षक संघाच्या कार्याध्यक्ष जयश्री काशीकर उपस्थित होते.

क्रीडा ज्योतीचे मान्यवरांनी स्वागत केले. स्वागत व प्रास्ताविक कैलास पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व सत्काराचे निवेदन दिलीप अहिरे व चिमण सहारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक शेंडे यांनी केले तर संजय आव्हाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. तीन दिवसीय हिवाळी क्रीडा स्पर्धांकरिता मैदानी खेळाबरोबर विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. सकाळ व दुपार सत्रातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...