आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुविधा मिळत नसल्याने गुजरात मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील गावांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. याच दाैऱ्याहून परतताना त्यांनी रस्त्यालगत असलेल्या उंबरठाण येथील शाळेला भेट देऊन सातवीच्या मुलांशी संवाद साधला.
अचानक जिल्हा परिषदेच्या प्रमुख शाळेत आल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी तुम्हाला कशाची आवड आहे, असे विद्यार्थ्यांना विचारताच बहुतांश विद्यार्थ्यांनी गणिताची आवड असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे वेगवेगळे प्रश्न दिले अन् विद्यार्थ्यांनीही तत्परतेने प्रश्नांची याेग्य उत्तरे साेडवल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
आयआयटीएन असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना ग्रामीण भागात काम करण्याची आवड आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या याेजना अंमलात आणण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सुरगाणा दाैऱ्याहून परतताना जि.प.च्या शाळेला भेट दिली. या भेटीत शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी लता भरसट, उंबरठाण बीट विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे, संजय कुसाळकर, सरपंच गिरीश गायकवाड, माजी सरपंच सुरेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य माधव पवार, मुकुंदा गावित, यशवंत जाधव, गोपाळ पावर, मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, वर्गशिक्षक सतीश इंगळे, जयराम धूम, राजेश भोये, राजेंद्र गावित, सुमित्रा जाधव, संगीता भोये व योगिता महाले उपस्थित होते.
उंबरठाण शाळेत करिअर मार्गदर्शन केंद्रही
उंबरठाण शाळेतील विद्यार्थी परिसरातील तरुणांसाठी उंबरठाण शाळा परिसरात करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू केले असून त्याचे उद्घाटन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना तुम्हाला काेणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याविषयी माहिती विचारली. त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादानुसार शिक्षकांना त्यांना याेग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या आहेत.- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.