आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक वसाहत:सीएट कंपनीजवळील पूल बंद ;  रुंद करण्याची संघटनाकडुन मागणी

सातपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीजवळ असलेला धोकादायक पूल वाहतुकीसाठी शुक्रवारी ( दि ४) बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी अचानक पूल बंद केल्याने काही वेळ या मार्गावर वाहतूक खोळंबली होती. औद्योगिक वसाहतीतील महत्त्वाच्या रस्त्यावर सीएट कंपनीजवळ असलेल्या नैसर्गिक नाल्यावर ५० वर्षे जुना पूल असून खालच्या बाजूने तडे गेले आहेत. कठडे तुटल्याने काही दिवसांपासून तो धोकादायक बनला होता. या मार्गावर हजारो कामगार व अवघड वाहतूक होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. पूल दुरुस्तीबाबत औद्योगिक संघटनांनी वारंवार मागणी केली हाेती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात हाेते. त्यामुळेच हा पूल धोकादायक बनला होता. या रोडवर सीएट, कार्बन, महिंद्रा, व्हीआयपी, एबीबी कॅप्रिहन्स, माेठमाेठे लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट ऑफिस, वजनकाट्यासह शेकडो लहान-मोठ्या कंपन्या असून हजारो कामगारांसह शेकडो ट्रकद्वारे मालवाहतूक या मार्गाने होत असल्याने या पुलाची दुरुस्ती करत रस्ता रुंद करावा, अशी मागणी होत आहे.

नवीन पूल बनवताना रस्ता रुंद करावा
या मार्गावर मोठ्या कंपन्या आहेत. रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. हा पूल धोकादायक बनत आहे. नवीन पूल बनवताना रस्ता रुंद करावा अशी मागणी करूनही प्रशासनाने काहीच केले नाही.
- भिवाजी भावले,
सीएट युनियन अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...