आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्कॉन मंदिरात राधाराणीला 56 भोगांचा नैवैद्य:राधाराणीचा जन्मदिवस राधे राधेच्या जयघोषात साजरा; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मंदिरात रविवारी (दि.4) श्री राधाष्टमी अर्थात म्हणजेच श्रीमती राधाराणीचा जन्मदिवस राधे राधेच्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर साजरा करण्यात येणारा हा दुसरा मोठा महोत्सव असतो. दुपारी 12 वाजता 56 भोग श्रीमती राधाराणीला अर्पण करण्यात आले व महाआरती करण्यात आली.

सजावट करण्यात आली

राधाष्टमीचे औचित्य साधत मुंबई येथूून शिवराम प्रभू शहरातील मंदिरात आले होते. यावेळी त्यांनी प्रवचनातून भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे अतिशय कठीण आहे. परंतु राधाराणीची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे देखील सुलभ होते. राधाराणीच्या कृपेची याचना करत जर कुणी अश्रू ढाळले, तर त्याला आयुष्यभर दुःखाश्रू ढाळावे लागणार नाही. राधाराणी व श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम हे भौतिक स्तरावरील नसून आध्यात्मिक स्तरावरील आहे, याचेही वर्णन त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने केले. राधाष्टमीनिमित्त मंदिराची, तसेच श्री राधा कृष्णाच्या विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली होती.

पंचामृताने केला अभिषेक

महोत्सवाला रविवारी सकाळी पाच वाजता मंगल आरतीपासूनच सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जाप, दर्शन आरती व श्रीमद्भागवत प्रवचन झाले. राधाराणीचे गुणगान करणारे राधिकाष्टकमचे स्तवन तसेच अन्य व्रजभक्ती गीते सादर करण्यात आली. श्रीश्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा दुपारी पंचामृताने अभिषेक करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

अभिषेकानंतर महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समिती प्रमुख लीलाप्रेम प्रभू व अच्युत प्राण प्रभू, गोपालानंद प्रभू, रणधीर कृष्ण प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, आनंद चैतन्य प्रभू, सुमेध पवार, अकिंचन दास, सेवा प्रमुख नादिया कुमार दास, तुलसी सेविका माताजी, प्रिया गोरे माताजी आणि इतर अनेक कृष्णभक्तांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...