आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक नमाज पठणासाठी गर्दी:पूर्वजांचे स्मरण करत‎ ‘शब-ए-बरात’ साजरा‎

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर‎ मुस्लीम बांधवांनी मंगळवारी (दि.‎‎७) आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये मृत‎ नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण‎ केले. मशिदींमध्येही सामूहिक नमाजपठणासाठी गर्दी होती.‎ मशिदींमध्ये देशाच्या प्रगतीसह अखंडता टिकून रहावी‎ यासाठी खास दुआ पठण करण्यात आली.‎ इस्लामी कालगणनेत सलग तीन रात्री एकापाठोपाठ‎ येतात. शब-ए-मेराजनंतर शब-ए-बरात ही दुसरी रात्र‎ साजरी केली जाते.

मगळवारी सायंकाळपासून जुने‎ नाशिक, वडाळागाव परिसरात शब-ए-बरातची लगबग‎ पहावयास मिळत होती. खडकाळी मशिदीत विशेष दुआ‎ करण्यात आली. जुने नाशिकमधील हजरत सय्यद‎ सादिकशाह हुसेनी बाबा यांची बडी दर्गाह, आनंदवली‎ येथील हजरत सय्यद रांझेशाह बाबा दर्गाह, पांडवलेणी‎ जवळील हजरत सय्यद मलिकशाह हुसेनी बाबा‎ यांच्या दर्ग्यांवर भाविकांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...