आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलसह विविध शाळा व कॉलेजांमध्ये कर्मवीर डाॅ. वसंतराव पवार यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रेरणा दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर, उपमुख्याध्यापक उत्तमराव बस्ते, पर्यवेक्षक शरद शेजवळ, मंदाकिनी पाटील, संजीवनी घुमरे यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रेरणा दिनानिमित्त मराठा हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते नववी या गटात सदर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी कृतिका ठाकरे या विद्यार्थिनीने कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आचल आहेर या विद्यार्थिनीने कविता सादर केली डॉ. वसंतराव पवार यांनी मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेला स्वतःचे कुटुंब मानून संस्थेच्या विकासासाठी सर्वस्वपणाला लावून काम केले, असे मुख्याध्यापक दरेकर म्हणाले. सूत्रसंचालन श्रुती पाटील हिने केले. तर कार्यक्रमाचे आभार ऋतुजा दरवडे हिने मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.