आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययाेजना:डांबरी रस्त्यांवर सिमेंटचा मुलामा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यावर उपाययाेजना म्हणून महापालिकेकडून केविलवाणी मलमपट्टी करण्यात येत आहे. त्याचाच एक प्रकार म्हणजे डांबरी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत आता सर्रासपणे सिमेंट टाकून ते बुजविण्याचा देखावा महापालिका करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील एकही रस्ता असा नाही की, तिथे खड्डा नाही. हे खड्डे तात्पुरते बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

त्या अनुषंगाने कुठे खडी, मुरुम तर कुठे गट्टू टाकून केविलवाणी मलमपट्टी केली जात असतानाच आता डांबरी रस्त्यावर थेट सिमेंट भरण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयासमाेरील खड्ड्यातून उघडकीस आला आहे. शहरात अनेक ठिकाणी अशाचे प्रकारे काम सुरू असल्रयाने पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे सिमेंट काँक्रीट दाेनच दिवसांत उखडणार असल्याचे या भागातील नागरिक बाेलत आहेत. त्यामुळे अशा कामांवर आयुक्त काय भूमिका घेणार? असा सवालही केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...