आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा) आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस(सातपूर) येथे ई-वेस्ट संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, निमाचे अध्यक्ष बेळे, ई वेस्ट संकलन केंद्राचे समनव्ययक सचिन शाह, विभागीय अध्यक्ष प्रवीण जयकृष्णन, डिस्ट्रक्ट गव्हर्नर राजेश काेठावदे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निमा व लायन्स क्लब यांनी हा निर्णय घेतला आहे, असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.
यामुळे संकलन महत्त्वाचे
भंगार, लाेखंड, तांबे हे खरेदी करणारे असल्याने त्याचे संकलन हाेते. ई वेस्ट मात्र वर्षानुवर्षे कंपन्यांत पडून असते. त्यातील बऱ्याच पार्टस्चे विघटन करता येत नाही, त्यामुळे ताे कचऱ्याच्या स्वरूपात कायम राहाताे. त्यातून तांबे, अॅल्युमिनियम काढता येते इतर काढता येत नाही. याचमुळे या कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.