आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राची स्वच्छ शहर स्पर्धा:स्वच्छ शहर सर्वक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात; सार्वजनिक स्वच्छतेसह घरगुती कचऱ्याची पाहणी करणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वक्षणासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवारी संध्याकाळी नाशकात दाखल झाले आहे. पुढील चार दिवसात घरगुती, व्यावसायिक कचऱ्याची विल्हेवाट, घंटागाडीद्वारे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी होणारी स्वच्छता याची पाहणी करणार आहे.

दरम्यान, देशातील पहिल्या दहा शहरात नाशिकला आणण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी 700 सफाई कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या नियमित जवळपास 1500 सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आता नागरिकांनीही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

स्वच्छ व सुंदर नाशिक अशी ओळख असूनही आतापर्यंत केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेत देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरात निवड होण्याचा मान नाशिकला मिळू शकलेला नाही. 2019 मध्ये दहा लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील पाचशे शहरांमध्ये 67 वा क्रमांक लागला होता. सन 2020 मध्ये अवघ्या एका गुणाने संधी हुकून देशातील अकरावे स्वच्छ शहर म्हणून नाशिकचे नाव उंचावले होते. दरम्यान, पुढील वर्षी देशातील पहिल्या दहा शहरात नाशिकला येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अशी परिस्थीती असताना सन 2021 मध्ये 17 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ही घसरण होण्यासाठी बांधकाम साहित्य मलबा विल्हेवाटीत आलेले अपयश तसेच नागरिकांचा प्रतिसाद कमी पडल्याचे प्रमुख कारण होते. दरम्यान, पहिल्या टप्प्यात घंटागाडी, खत प्रकल्प तसेच प्रमुख रस्त्यावरील स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारी याबाबत सर्वक्षण केले गेले.

आाता दुसऱ्या टप्प्यात शहरातील सहाही विभागातील रहीवासी भाग, वाणिज्य वा व्यावसायीक इमारतीतील कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता व एकुणच व्यवस्थापनाची पाहाणी केली जाणार आहे. त्याबरोबरच बस डेपो, रेल्वे स्थानक, गोदावरी किनाऱ्यावरील गर्दीचा भाग, रामकुंड, प्रमुख धार्मिकस्थळांजवळील स्वच्छतेची पाहाणी केली जाणार आहे. त्यानंतर काही महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील सर्वक्षण होणार असून त्यात, शहरातील घरगुती, व्यावसायीक व वाणिज्य वापराच्या इमारतीतील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पाहाणी केली जाणार आहे.

नाशिककरांनी सहकार्य करावे

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धच्या पाहाणीसाठी पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या स्पर्धत देशातील पहिल्या दहा शहरात येण्यासाठी महापालिका कसोशीने प्रयत्न करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहराची स्वच्छता करून घेतली जात आहे. यात कोठे त्रुटी राहत असल्यास नागरिकांनी कळवावे तसेच आवश्यक ते सहकार्य करावे. डॉ आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

बातम्या आणखी आहेत...