आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकच्या मल्हार अमेय भार्गवे याला केंद्र सरकारकडून अतिशय मानाची समजली जाणारी हार्मोनियम वादनासाठीची १० ते १४ वयोगटाकरिता असलेली शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
केंद्रीय कला, क्रीडा व सांस्कृतीक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी देशभरातून अवघ्या सहा कलाकारांची निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातील दाेघांचा समावेश आहे. मल्हार इयत्ता सातवीतला आनंद निकेतन शाळेचा विद्यार्थी आहे. त्याचे आजोळ म्हणजे दसककर कुटुंबीय हे नामांकित संगीत घराण्यांपैकी एक आहे. बालवयातच मल्हारला संगीतकलेचे बाळकडू मिळाले. पणजोबा ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित प्रभाकर दसककर हे गायक व संवादिनी वादक होते. मल्हारचे हार्मोनियम वादनाचे शिक्षण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संवादिनी वादक पंडित सुभाष दसककर यांच्याकडे चालू आहे.
हार्मोनियम वादनाबरोबरच सिंथेसायझर वादन, तबला वादन, गायन आवडते. पाचवीला गणित प्रभुत्व या परीक्षेत तो जिल्हाभरातून पहिला आला होता. सहावीत त्याला डॉ. होमी भाभा सायन्स परीक्षेत सुवर्णपदक मिळाले. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक स्पर्धा, भास्कराचार्य प्रतिष्ठान गणित परीक्षा, मराठी विज्ञान परिषदेच्या वेध परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.