आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) संस्थेच्या अकॅडमिक पॅनलतर्फे के. के. वाघ अभियांत्रिकी काॅलेजमध्ये ‘सीईओ कनेक्ट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शाखेच्या २०० विद्यार्थ्यांना नामवंत उद्योगपतींशी संवाद साधता यावा हा उपक्रमाचा मुख्य उद्देश हाेता.
उद्योजक राहुल मल्होत्रा यांनी इंटरप्रेनाेरशिप स्किल अॅण्ड स्टार्टअप फॉर इंजिनिअर या विषयावर मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण संपताच सुरुवातीला एखाद्या कंपनीमध्ये काम करायला हवे. तिथे टाइम मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, प्लॅनिंग, लीडरशिप आणि डिसीजन मेकिंग या बद्दलचे ज्ञान घेता येईल, असे मल्हाेत्रा म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, डॉ. व्ही. एस. माने, डॉ. आर. मुंजे, डॉ. पी. डी. जाधव, डॉ. पी. जे. पवार, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.