आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांच्या तारखांमध्ये फेरबदल:१७ अभ्यासक्रमांच्या सीईटी पात्रता परीक्षा आता  ५ ते २५ ऑगस्टदरम्यान

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीइटीच्या वेळापत्रकात सीइटी सेलने बदल केले आहेत. केंद्राच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देशपातळीवर जाहीर जेईई (मेन) आणि ‘नीट’ परीक्षांचे वेळापत्रक व राज्याच्या सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकात साम्य आढळले होते. त्यामुळे राज्याच्या सीईटी सेलने शैक्षणिक सत्र २०२२-२३ दरम्यान प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सतरा पात्रता परीक्षांच्या तारखांमध्ये फेरबदल केले आहेत. ५ ते २२ ऑगस्टदरम्यान सीईटी होईल.

या वेळापत्रकाप्रमाणे होतील सीइटी परीक्षेचे पेपर

तंत्रशिक्षण व कृषीशिक्षण
अभियांत्रिकी प्रथम वर्ष (पीसीएम ग्रूप) ५ ते ११ ऑगस्ट, औषधनिर्माणशास्राचे प्रथम वर्ष (पीसीबी)-१२ ते २० ऑगस्ट, प्रथम वर्ष कृषी शिक्षण (१५, १६ आणि १७ ऑगस्ट वगळून) एमबीए, एमएमएस या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पूर्वपरीक्षा २३, २४, २५ ऑगस्टदरम्यान होईल. एमसीए-४ आणि ५ ऑगस्ट, बी.एचएमसीटी-२१ ऑगस्ट, बॅचर ऑफ प्लॅनिंग-४ ऑगस्ट

व्यावसायिक अभ्यासक्रम
बीए बीएड-४ ऑगस्ट, विधी (तीन वर्ष)-३ व ४ ऑगस्ट, बीएड-२१ व २२ ऑगस्ट, एमपीएड-२१ ऑगस्ट

वैद्यकीय अभ्यासक्रम
भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी, प्रोस्थोस्टिक्स अँड ऑर्थोटिक्स आदी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा ११ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षा पूर्वीच्या केंद्र शासनाच्या वेळापत्रकानुसार एकाच कालावधीत येत होत्या.

बातम्या आणखी आहेत...