आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागण्यांसाठी 16 महिन्यांपासून संप:हिंदुस्तान नॅशनल ग्लास च्या 400 कामगारांचे साखळी उपाेषण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज कंपनीतील ४०० कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी १६ महिन्यांपासून संप पुकारला आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने संप दुर्लक्षित करून बाहेरच्या राज्यातील कामगारांची भरती केल्याचा आराेप सीटूच्या वतीने करण्यात आला. असून व्यवस्थापनाच्या कामागरविराेधी धाेरणाच्या निषेधार्थ साेमवारपासून कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमाेर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.

तीन महिन्यांपासून कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

अशा आहेत मागण्या
२७ एप्रिल २०१९ पासून प्रलंबित वेतनवाढ करार करावा
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार ९१ कायम कामगारांचा ले ऑफ व त्यांच्या राज्यभर केलेल्या बदल्या स्थगित कराव्यात
कामगारांवर दाखल आरोपपत्र मागे घ्यावे.

बातम्या आणखी आहेत...