आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळ्यातील दोन युवकांच्या धाडसाचे कौतुक‎:चाकीने सिनेस्टाइल पाठलाग‎ करत मोबाइलचाेरास पकडले‎

देवळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे दोन धाडशी युवकांनी दुचाकीने‎ मोबाइलचाेरांचा सिनेस्टाइलने दोन कि.मी.‎ पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात‎ दिले.‎ दर रविवारी देवळा येथे आठवडे‎ बाजाराच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत‎ चोरटयांकडून मोबाइल लंपास केले जातात.‎ आतापर्यंत या चोरट्यांमुळे अनेक‎ नागरिकांना आपले मोबाइल गमवावे लागले‎ आहेत.‎ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळा‎ बसस्थानकात रावळगाव येथील एक दाम्पत्य‎ बसमध्ये चढत असतांना एका चोरटयाने‎ त्यांच्या पत्नीला धक्का देऊन बाजूला केले व‎ पतीच्या खिशातील मोबाईल काढून पळ‎ काढला. मोबाइल चोरीला गेल्याची बाब‎ वेळीच निदर्शनास आल्यानंतर दाम्पत्याने‎ आरडाओरडा सुरू केला.

परंतु तोपर्यंत सदर‎ चोरटा बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या‎ जोडीदाराच्या दुचाकीवर बसून सटाण्याकडे‎ फरार झाला होता. ही बाब बसस्थानकासमोर‎ असलेल्या चेतन गोविंद आहेर व भूषण शरद‎ आहेर या युवकांच्या लक्षात येताच त्यांनी‎ आपल्या बुलेटवरून या चोरट्यांचा पाठलाग‎ सुरू केला.‎ पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच त्या‎ चोरट्याने मोबाइल रस्त्यावर फेकून दिला,‎ तुम्ही परत जा असे दोन्ही युवकांना सांगितले.‎ परंतु युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.‎

अखेर माळवाडी फाट्याजवळ मोबाइल‎ चोरणारा चोरटा गाडीवरून खाली उतरला व‎ दुसऱ्या चोरट्याने दुचाकीसह पळ काढला.‎ दोन्ही युवकांनी या चोरट्यास पकडून देवळा‎ पोलिसांच्या हवाली केले. या युवकांच्या‎ धाडसामुळे चोरीस गेलेला मोबाइल परत‎ मिळाल्यामुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले‎ आहे. शहर पोलिसांनी आठवडे बाजारातून‎ मोबाइल चोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा,‎ तसेच बसस्थानक परिसरात गस्त वाढवावी,‎ अशी मागणी केली जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...