आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर वेधशाळेचा अंदाज:बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गुरुवारी (दि.२५) कोकण, घाटमाथ्यावरील काही भाग तसेच माथेरान येथे हलक्या स्वरूपातील पाऊस वगळता इतर सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भात शुक्रवार ते रविवारपर्यंत यलो अलर्ट नागपूर वेधशाळेने जाहीर केला आहे.

औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड, पुणे सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने गुरुवारी उघडीप दिली होती.माथेरान येथे ६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर वेधशाळेने बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...