आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती:मराठवाड्यात 3 दिवस पावसाची शक्यता ; मांडस चक्रीवादळाचे राज्यात आगमन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांडस चक्रीवादळामुळे मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ विरले असून वेल्लोरजवळ तीव्र दाब क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. ते नैऋत्येकडे झुकले असल्याने विदर्भ वगळता मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत सोमवार आणि मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

थंडी वाढली : उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या गार वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी ओझर येथे नीचांकी ४.९, औरंगाबादेत ७.५,नाशिक येथे १०.४ से. तापमानाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...