आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंधश्रद्धा टाळण्यासाठी चांदगुडे दाम्पत्याचा जनजागृतीपर उपक्रम

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मासिक पाळी’ या विषयावर संकोचाने बाेलले जात असून अंधश्रद्धा व गैरसमजुती माेठ्या प्रमाणात असल्याने त्यास छेद देण्यासाठी लेकीला आलेल्या पहिल्या मासिक पाळीचा दिवस महाेत्सव म्हणून साजरा करण्यात आला. हा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे व अॅड. विद्या चंादगुडे या दाम्पत्याने आयाेजिला.

पारंपरिक समजुती व पूर्वग्रहामुळे तिच्या मनात अपराधीपणाचा भाव निर्माण होतो. पण या सर्वाना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दाम्पत्याने केले आहे. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये, समाजाचा मासिक पाळीबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी चांदगुडे दाम्पत्याने मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले.

या क्रांतिकारी उपक्रमाची समाजमाध्यमातून राज्यभर चर्चा होत आहे. चांदगुडे यांची तेरा वर्षांची मुलगी यशदा हिला परवा प्रथमच मासिक पाळी आली. एका हाॅटेलमध्ये तिच्या प्रथम मासिक पाळीचे आयोजन करण्यात आले होते. ‘आता माझी पाळी, मीच देते टाळी’ हे घोषवाक्य घेऊन उपक्रम राबवला गेला. सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले. अॅड. समीर शिंदे यांनी आभार मानले. सॅनिटरी पॅडचे वस्तीतील गरजू मुलींना वाटप करण्यात आले. मासिक पाळी आलेल्या स्त्री अथवा मुलीस घरात सन्मान मिळावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात इतर महत्त्वाचे
महिला व पुरुषांचे मासिक पाळी विषयावर चर्चासत्र झाले.
डाॅ. टी.आर. गोराणे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, जयश्री पाटील, अॅड विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर केले.
मासिक पाळी या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानातून जनजागरण केले.
या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा यासाठी या महोत्सवात कोष हा लघुपट दाखवून मासिक पाळीबाबत जनजागृती केली.
मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता उपस्थित महिलांनी म्हटल्या.
संत वाड्मयातील रचनांमध्ये सापडणाऱ्या अभंगांचे सादरीकरण करण्यात आले.
मासिक पाळी विषयावर असलेली प-पाळीचा ही पुस्तिका वितरीत.

बातम्या आणखी आहेत...