आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंधश्रद्धेच्या विराेधात चांदगुडे दाम्पत्याचा उपक्रम; पहिल्याच मासिक पाळीचा उत्सव

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्रमाळशाळेतील विद्यार्थिनीस मासिक पाळी असल्याने तिला वृक्षाराेपणास नकार दिल्याची राज्यभर चर्चा हाेत असतानाच या अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्रा. कृष्णा चांदगुडे व त्यांच्या पत्नी अॅड. विद्या चांदगुडे हे स्वत:च्या मुलीच्या पहिल्याच मासिक पाळीचा उत्सव साजरा करत आहेत. यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिकादेखील छापली आहे.

‘आता माझी पाळी, मीच देते टाळी’ हे घाेषवाक्य घेऊन चांदगुडे यांनी त्यांची कन्या यशदा चांदगुडे हीला तेराव्या वर्षी प्रथमच पाळी आली. त्याचा उत्सव साजरा केला जात आहे. अंनिसच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय वा समारंभात प्रबाेधन केले जाते. मात्र, या प्रबाेधनाला कृतीची जाेड देण्यासाठीच हा उत्सव साजरा हाेणार आहे. तसेच या विषयावर व्याख्यान, चर्चासत्र, गाणी, लघुपट व पुस्तिकांचे व सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही करण्यात येणार आहे.

समाजात मासिक पाळीचे चार दिवस अस्पृश्य मानून महिलांना बाजूला बसविले जाते. त्याला छेद देत यावेळी यशदाच्या हातूनच पाणी आणि भाेजन दिले जाणार आहे. हा विषय अंधश्रद्धा न मानता ही शारीरिक क्रिया असल्याची जागृती यातून करण्यात येणार आहे.

पुरुष-महिलांचे चर्चासत्र
मासिक पाळीविषयी घरात मनमाेकळे बाेलणे सुरू झाल्यावरच त्याचे गैरसमज दूर हाेतील, या उद्देशाने साधारणत: ५० पती-पत्नी यांना निमंत्रित करून तज्ज्ञांकडून चर्चासत्र घेण्यात येणार आहे.

कन्येच्या आनंदाचा सन्मानाचा क्षण
आमची कन्या पाळी आल्याने तो आनंदाचा क्षण साजरा करणार आहाेत. यातूनच समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
अॅड. विद्या चांदगुडे, यशदाची आई

बातम्या आणखी आहेत...