आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल:निमाणीमधून सिटी लिंक 96 बस फेऱ्यांमध्ये बदल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निमाणी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निमाणीतून सुटणाऱ्या बसेसच्या ६२ फेऱ्या जुना आडगावनाका येथून तर ३४ बसफेऱ्या तपोवन डेपोतून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पालिकेचे नुकसान होणार असले तरी कोणताही आर्थिक भुर्दंड प्रवाशांवर लादला जाणार नसल्याचे सिटी लिंक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निमाणी बस स्टँड परिसरात दिंडोरीनाका तसेच पंचवटी कारंजा हा अतिशय वर्दळीचा भाग असल्याने येथे वाहतूक काेंडी नित्याचीच झाली आहे.

खासकरून, निमणी बसस्थानकातून बस बाहेर पडली की, ती रस्ता ओलांडताना वाहतूक काेंडी हाेते. ही बाब लक्षात घेत सिटी लिंक प्रशासनाने ६२ बसफेऱ्यांना पंचवटी डेपो कॉर्नर (जुना आडगावनाका) येथे टर्न दिला आहे. तर ३४ बसफेऱ्या तपोवन डेपोतून हाेणार आहेत. या मार्गावर फेरनियोजन मार्ग क्रमांक १०१ ए, १०२ बी, १०६ ए, १०९ ए, १११ बी, १२८ ए, १२९ ए, १३० ए असे हे ८ मार्ग असतील. त्याचप्रमाणे १०१ ए, १०२ बी, १२९ ए, १३० ए या चार मार्गावरील ३४ बसफेऱ्यादेखील तपोवनात हलविण्यात आलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...