आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:11 हरकतींनुसार 7 प्रभागांच्या रचनेत तर 2 प्रभागांच्या लोकसंख्येत बदल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातव्या पंचवार्षिक महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी महापालिका निवडणूक विभागाने अंतिम प्रभागरचना जाहीर केली. त्यात २११ हरकतींपैकी जवळपास ११ हरकतींनुसार सात प्रभागांच्या रचनेत बदल केले असून प्रभाग हद्दीच्या व्याप्तीत येणाऱ्या कॉलनीच्या नावाशी संबंधित सात फेरबदलांनाही हिरवा कंदिल दाखवला. दरम्यान, प्रभाग ९, १६ व १७ तसेच प्रभाग क्रमांक ३५ व ३७ मध्ये झालेल्या बदलातून दिग्गजांना धक्का बसला आहे.

राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी स्थगित झालेली प्रक्रिया सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी मंगळवारी आदेश प्रसिद्ध करून अंतिम प्रभागरचना तयार करण्याच्या कार्यक्रम जाहीर केला होता. १८ पैकी १६ महापालिकांची निवडणूक प्रक्रिया अंतिम झाल्याचेही स्पष्ट केले होते. १७ मे रोजी अंतिम प्रभागरचनाही जाहीर करण्याचे आदेश होते मात्र महापालिका निवडणुकीशी संबंधित सर्वाच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर येत्या मंगळवारी सुनावणी होणार असल्यामुळे अंतिम प्रभाग-रचना तत्पूर्वीच जाहीर केली गेली. प्रारूप प्रभाग रचनेवर जवळपास २११ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी प्रभागातील हद्दीशी संबंधित सात प्रभागांतील चार हरकतींच्या अनुषंगाने बदल केले गेले.

बातम्या आणखी आहेत...