आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी नवरात्रोत्सवाची!:सप्तश्रृंगी देवीच्या पूजा नियमात बदल; 25 किलो चांदीच्या उत्सवमूर्तीवर होणार अभिषेक

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेंदूर कवच निघाल्यानंतर तेजोमय स्वरूप प्राप्त झालेली भगवती देवी सप्तशृंगीची मूळ मूर्ती. - Divya Marathi
शेंदूर कवच निघाल्यानंतर तेजोमय स्वरूप प्राप्त झालेली भगवती देवी सप्तशृंगीची मूळ मूर्ती.

नवरात्रोत्सव अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनानंतर यावर्षीचा नवरात्रोत्सव अगदी जल्लोषात होणार आहे. असे असताना नाशिक येथील सप्तश्रृंगी मातेच्या अभिषेकाच्या नियमात बदल करण्यात आले आहे.

सप्तश्रृंगी मातेवर 25 किलो चांदीच्या उत्सवमूर्तीवर अभिषेक होणार आहे. 26 सप्टेंबरपासून देवीचे मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

हे केले बदल

श्री भगवती स्वरूपाच्या निरंतर पूजेसाठी हा बदल जरूरीचा आहे. त्यामुळे पाणी, दूध, लोणी, मध, साखर, नारळपाणी तसेच तुपाचा वापर बंद करण्यात आला आहे. 2014 पासून श्री भगवती स्वरूप (मूर्ती) संवर्धना बाबत चर्चा सुरू होती, विविध ठरावही झाले होते. नियोजनाचा विचार करता भारतीय पुरातत्व व आयआयटी पवई यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रथम श्री भगवती मंदिराच्या वरील डोंगराचा परिसराचे तांत्रिक निरिक्षण आणि त्याबाबतच्या उपाययोजना करून, श्री भगवती स्वरूपान्या प्रत्यक्ष संवर्धन व देखभाल प्रक्रियेची सुरुवात मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या पूर्व परवानगीने व काटेकोर नियोजन करून भारतीय पुरातत्व विभागाकडील नोंदणीकृत संस्था में अजिंक्यतारा कन्सलटन्स, नाशिक यांच्या मार्फत व सेवानिवृत्त अधीक्षक डॉ. सिंग यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शेंदूर कवच निघाल्यानंतर तेजोमय स्वरूप प्राप्त झालेली भगवती देवी सप्तशृंगीची मूळ मूर्ती.
शेंदूर कवच निघाल्यानंतर तेजोमय स्वरूप प्राप्त झालेली भगवती देवी सप्तशृंगीची मूळ मूर्ती.

शेंदूर काढल्याने तेजोमय स्वरूप आले

20 जून ते 8 सप्टेंबर 2022 दरम्यान मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. शेंदूर (कवच ) काढण्यात आल्याने अत्यंत प्राचीन व मूळ तेजोमय स्वरूप श्री भगवतीच्या मूर्तीस प्राप्त झाले आहे. हे तेजोमय स्वरूप जसेच्या तसे जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळ, पुरोहित वर्ग तसेच स्थानिक गावकरी, विश्वस्त संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी व भाविक भक्तांची असल्याचे विश्वस्त मंडळाने म्हटले आहे.

पहिल्या माळेपासून दर्शन खूले

26 सप्टेंबर पासून 22 श्री भगवती मंदिर सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. यापुढील विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाने निर्धारित केलेले महत्वाचे सण उत्सव व मुहूर्त वगळता इतर सर्व दिवशी चांदीच्या उत्सव मूर्तीवरच श्री भगवतीची पंचामृत महापुजा नियोजित असेल याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन विश्वस्त संस्थेकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...