आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:निमाणीमधून सिटीलिंकच्या 96 बसफेऱ्यांमध्ये बदल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निमाणी परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी निमाणीतून सुटणाऱ्या बसेसच्या ६२ फेऱ्या जुना आडगाव नाका येथून तर ३४ बसफेऱ्या तपोवन डेपोतून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पालिकेचे नुकसान होणार असले तरी कोणताही आर्थिक भुर्दंड प्रवाशांवर लादला जाणार नसल्याचे सिटीलिंक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निमाणी बसस्टँड परिसरात दिंडोरी नाका तसेच पंचवटी कारंजा हा अतिशय वर्दळीचा भाग असल्याने येथे वाहतूककाेंडी नित्याचीच झाली आहे. खासकरून, निमाणी बस स्थानकातून बस बाहेर पडली की, ती रस्ता ओलांडताना वाहतूककाेंडी हाेते. ही बाब लक्षात घेत सिटीलिंक प्रशासनाने ६२ बसफेऱ्यांना पंचवटी डेपो कॉर्नर ( जुना आडगाव नाका ) येथे टर्न दिला आहे. तर ३४ बसफेऱ्या तपोवन डेपोतून हाेणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होणार असली तरी या बसेसचे किलोमीटर वाढून त्याचा आर्थिक फटका सिटीलिंकला बसणार आहे. मात्र वाहतूक काेंडीवर उपाय म्हणून हा निर्णय झाल्याचे सिटीलिंकने स्पष्ट केले आहे.

या मार्गावर फेर नियोजन
मार्ग क्रमांक १०१ ए, १०२ बी, १०६ ए, १०९ ए, १११ बी, १२८ ए, १२९ ए, १३०ए असे हे ८ मार्ग असतील. त्याचप्रमाणे १०१ ए, १०२ बी, १२९ ए, १३० ए या चार मार्गावरील ३४ बसफेऱ्या देखील तपोवनात हलविण्यात आलेल्या आहेत. सदर बसेस देखील निमाणी येथे न येता दुसऱ्या मार्गाने तपोवनात जातील व तेथूनच मार्गस्थ होतील.

बातम्या आणखी आहेत...