आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभागाकडे तक्रार:भात बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक ; नुकसानभरपाईची मागणी

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यात खेडभैरव येथे खरीप हंगामात मोहन रामनाथ वाजे या शेतकऱ्याने दप्तरी १००८ वाण असलेले बियाणे खरेदी केले. १४५ दिवसांत हे पीक निसवले, पण त्याला कुसळ असलेले लोंबट आले. लागवड केलेले क्षेत्र १ हेक्टर असून त्यामुळे शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च वाया गेला आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश परदेशी, पंचायत समिती कृषी अधिकारी के. एल भदाणे, कृषी सेवा विक्रेता रमेश वाजे यांनी शेतीस भेट दिली असता तक्रार निवारण समितीने पंचनामा करून अहवालात असे नमूद करण्यात आले की, लागवड केलेली दप्तरी १००८ हे वाण पूर्णपणे कुसळी भात आले असल्याचे नमूद केले, परंतु झालेल्या नुकसानीकडे दप्तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दिली असून दप्तरी कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाईची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...