आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:500  रुपयाच्या खाेट्या नाेटा देत सिडकाेत भाजीविक्रेत्यांची फसवणूक

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपेंद्रनगर भाजी बाजारात ५०० रुपयांच्या खाेट्या नाेटा सापडल्या. एका ग्राहकाने भाजी खरेदी करुन पाच ते सहा विक्रेत्यांना फसवले. या नाेटा एवढ्या हुबेहूब आहेत की, लगेच त्या खाेट्या आहेत हे कळतच नाही.रविवारी (दि. ६) सायंकाळी उपेंद्रनगर भागात भाजी बाजारात ग्राहकाने पाच ते सहा भाजी विक्रेत्यांना अशा पद्धतीने फसविले.

पाचशे रुपयाची नोट देत भाजी खरेदी केली व त्यानंतर तेथून काढता पाय घेतला. थोड्या वेळाने हा प्रकार भाजी विक्रेत्यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर व्यक्तीचा शोध घेतला. मात्र तो तेथून गायब झाला होता. पाचशे रुपयाची नोट ही एकमेकाला चिटकलेली असून ती दोन्ही बाजूने मोकळी होते. मात्र सुरुवातीला ही नोट खोटी की खरी हे लक्षात न आल्याने भाजी विक्रेत्यांची फसवणूक झाली याबाबत विक्रेत्यांनी रात्री उशिरा अंबड पोलिस ठाण्यात तक्रार केली.

खोटी नोट देऊन ग्राहक खरेदी करून गेला
एका ग्राहकाने भाजी खरेदी करुन ती पाचशेची नाेट देऊन पळ काढला. बाजारातील. ५ ते ६ विक्रेत्यांची त्याने अशा पद्धतीने फसवणूक केली आहे. - सोनू जाधव, भाजी विक्रेता.

बातम्या आणखी आहेत...