आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये चेक बाऊन्स प्रकरण:अटक न करता जामिनासाठी मदतीच्या नावाने 2 हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अटकेत

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेक बाऊन्स प्रकरणात पकड वाँरटमध्ये अटक न करता न्यायालयात जामीनासाठी मदत करण्याचे सांगत तक्रारदाराकडून 2 हजारांची लाच घेतांना ओझर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. रविवार दुपारी 12 वाजता सिता गुंफा परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कारभारी भीला यादव वय 52 असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी हातउसनवार पैसे घेतले आहे. त्याबदल्यात चेक दिले आहेत. चेक बाऊन्स झाल्याने संबधीत व्यक्तीने त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्यात तक्रारदाराच्या विरोधात न्यायालयाने अटक वाँरट काढले आहे. तक्रारदार हा अोझर मधील रहिवाशी असल्याने अोझर पोलिस ठाण्याचे समन्स वाँरट बजावणी करणारा कारभारी यादव याने तक्रारदाराला फोन करुन बोलवून घेतले. पकड वाँरटमध्ये जामीनदाराचे कागदपत्र घेऊन सहकार्य करण्यासाठी 2 हजारांची लाचेची मागणी करत काळाराम मंदिर परिसरात बोलवले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली. निरिक्षक साधना इंगळे, सचिन गोसावी, नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने अधिक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहळदे, उपअधिक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...