आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड पाेलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या भागात चोरीच्या घटनांनी पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. तीन दिवसांत मोबाइलचे दुसरे दुकान फोडून मोबाइलसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी पहाटे राणेनगर येथे वेद मोबाइल शॉपीचे शटर वाकवून चोरट्याने मोबाइल व रोख रक्कम लंपास केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या सततच्या घडणाऱ्या घटना नागरिकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. दोन दिवसांपूर्वीच संजीवनगर येथे चोरट्याने मोबाइल दुकान फोडून तब्बल ३१ मोबाइल लांबविले होते.
तर गुरुवारी पहाटे राणेनगर येथे वेद मोबाइल शॉप येथून सहा मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली. निशांत मुकणे यांनी अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र घटना घडूनही पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला.
जादा बिल आकारणी, डाॅक्टरला धमकी
नाशिक उपचाराचे जादा बिल आकारणी केल्याच्या कारणातून रुग्णाच्या नातेवाइकांनी महिला डाॅक्टरला शिवीगाळ करत धमकी दिली. डाॅ. सुषमा भुतडा यांनी याबाबत तक्रार मुंबई नाका पाेलिस स्थानकात दिली. त्यांचे अशोका मार्ग येथे सुप्रीम हेल्थ अॅण्ड ट्रामा केअर सेंटर आहे. सुनीता खैरे या उपचारासाठी दाखल होत्या. उपचाराचे ३० हजार रुपये आणि १९ हजार ८४५ बिल झाले होते. संशयित प्रवीण खैरे, वैशाली बनसोडे एक अनोळखी इसमाने आम्हाला न विचारता रुग्णाला गोळ्या व अौषध दिले त्याचे जादा बिल लावले असे बोलत आरडाअोरड करत अंगावर धावून जात धमकी दिली.
खूनप्रकरणी ९ वर्षे फरार संशयित अटकेत
नाशिक खुनाच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार संशयित मंगरू ऊर्फ अब्दुल मन्नान चौधरी यास गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने मुंबई येथे अटक केली. ४ मार्च २०१३ रोजी मेहबूबनगर, वडाळागाव येथे पिअोपी कामाचे ठेकेदार अब्दुल सलाम मुस्तफा चौधरी याचा गळा आवळून खून केल्याचा गुन्हा त्याच्यावर आहे.
मयत अब्दुल चौधरी यांच्याकडे दाेन परप्रांतीय कामाला होते. मयत चौधरी यांनी त्यांना पैसे आणि सुट्टी दिली नाही याचा राग येऊन संतापात चौधरी यांचा गळा आवळून संशयिताने खून केला हाेता. तेव्हापासून ताे फरार हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.