आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्याची चेरापुंजी कोरडीच; अद्याप फक्त 6 टक्के पाऊस

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात जूनच्या सरासरी पर्जन्यमानातील अवघा ६ टक्के पाऊस पडल्याने गेल्या २२ दिवसांपर्यंत हा तालुका अद्यापही कोरडाच आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मालेगाव तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या धुवाधार पावसामुळे तेथील टक्केवारी थेट १२३.८ वर पोहोचली आहे आणि नाशिक जिल्ह्यातील जे पावसाचे तालुके आहेत, त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४, पेठ ५७, नाशिक २७.६, सुरगाणा ४८.८ टक्केच पाऊस झाल्याने भातासह शेतीपिकांवर मात्र परिणाम होण्याची शक्यता शेतकरी आणि तज्ज्ञ वर्तवित आहेत.

जिल्ह्यात फक्त ४६ टक्के पाऊस संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत जिल्ह्यात १२७.९ मि.मी. पाऊस व्हायला हवा होता. मात्र, अद्याप केवळ ५७.९ मि. मी. पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी फक्त ४६.६ एवढी आहे. तर गेल्यावर्षी जूनच्या २२ तारखेपर्यंत ८३.४ मि.मी. पाऊस झाला होता. त्याची टक्केवारी ६५.२ होती. दोन्ही वर्षांत जून महिन्यात पाऊस कमीच झाल्याचे दिसत असले तरी यंदा त्याची टक्केवारी अधिकच खालावल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीतून स्पष्ट होते.

इगतपुरीत सर्वाधिक पाऊस; यंदा निराशा इगतपुरी तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पावसाची नोंद होते. यंदाही आतापर्यंत इगतपुरीत ३६३.९ मि. मी.पाऊस अपेक्षित होता. मात्र, केवळ ६.४ टक्के पाऊस झाला आहे. तोच गेल्यावेळी १९५.४ मि. मी. पाऊस झाला होता. त्याची टक्केवारी ५३.८ एवढी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊसच झाला नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामुळे मात्र भातशेती करणारे शेतकरी चिंतेत आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...